कावळा आणि कोल्हा :
एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काव,ळा जंगलातील एका झाडावर बसला.
चपाती खाण्याचा विचार करत असताना कावळ्याच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाली उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कोल्ह्याची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.
आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली.
कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”
कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.
जात असताना कोल्ह्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.
कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक कळाली.
तात्पर्य: मित्रांनो या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळत.
एक म्हणजे कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये.
दुसर म्हणजे लालच खूप वाईट सवय आहे.
No comments:
Post a Comment