कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Wednesday, February 16, 2022

लोकमानस : भारताचा आगामी काळ प्रचंड महागाईचा?

 

लोकमानस : भारताचा आगामी काळ प्रचंड महागाईचा?


युक्रेन वादावरून रशिया-अमेरिका युद्धतणाव, सौदी अरेबियाचा खनिजतेल दरवाढीचा निर्णय आणि पाच राज्यांतील निवडणुका या तिहेरी संकटात सापडली आहे.

दीर्घकाळापासून पेन्शनवाढीच्या प्रतीक्षेत असलेला निवृत्त जनवर्ग सध्या प्रचंड चलनवाढ, स्थिर व्याजदर, वाढता वैद्यकीय खर्च अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे. तद्वत करोनाकाळातील टाळेबंदीपासून बिघडलेली भारतीय अर्थव्यवस्था आता कोठे उभारी घेऊ पाहतेय, तोच युक्रेन वादावरून रशिया-अमेरिका युद्धतणाव, सौदी अरेबियाचा खनिजतेल दरवाढीचा निर्णय आणि पाच राज्यांतील निवडणुका या तिहेरी संकटात सापडली आहे. परिणामत: वित्तीय तूट भयावह प्रमाणात वाढतच चालली आहे. उद्योग आणि गृहकर्जावरील व्याजदर वाढून अर्थव्यवस्थेची गती आणखी मंदावू नये म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने तूर्त दिलासा दिला असला, तरी दिवसागणिक अर्थकारणाचा हत्ती तुटीच्या चिखलात डोळय़ांदेखत अधिकाधिक रुतत चालल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी निवडणुकांनंतर प्रचंड प्रमाणात इंधन दरवाढ करण्याशिवाय सरकारपुढे गत्यंतरच नाही! याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत महागाईही तितक्याच मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. अफाट अशा बेरोजगारवाढीत भारतीयांसमोर पुढील काळ अत्यंत कठीण असल्याचीच ही चिन्हे दिसत आहेत एवढे मात्र खरे!

No comments:

Post a Comment