डॉ. रणदीप गुलेरिया हे एम्सचे प्रमुख असून भारताच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत.
देशात करोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूप्रकारानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत भारतात १६,७६४ करोना रुग्णांची नोंद झाली. तर ९१,३६१ रुग्ण उपचाराधीन आहेत. अशातच देश ओमायक्रॉनच्या दहशतीखाली असताना एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी जनतेला दिलासा दिला आहे. वेगाने पसरणारा ओमायक्रॉन श्वसनमार्गावर विशेषतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र ज्यांना सहव्याधी नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची घाई करू नये.
गुलेरिया म्हणाले, “ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे होण्याचा वेगही अधिक आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त गृह विलगीकरणावर भर द्यायला हवा.ओमायक्रॉनचा फुफ्फुसांऐवजी वरच्या श्वसनमार्गावर आणि वायूमार्गावर परिणाम होत आहे. म्हणूनच ऑक्सिजन पातळी कमी झालेले किंवा डेल्टामध्ये आपण पाहिलेली इतर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण खूप कमी दिसतात. ताप येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी हे आपण येथे पाहत आहोत. यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास त्यांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी. कारण मग ते स्वतःला विलगीकरणात ठेवू शकतात आणि समाजातील इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतात”.
शुक्रवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की भारतात १ हजार २७० ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत, त्यापैकी ३७४ पूर्णपणे बरे झाले आहेत.भारताच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य, गुलेरिया यांनी यावर भर दिला की ज्यांना गंभीर आजार होण्याची अधिक शक्यता आहे त्यांच्यासाठी रुग्णालयातील बेड राखून ठेवले पाहिजेत.
हेही वाचा – करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकार सतर्क; नव्या लक्षणांसह आठ राज्यांना विशेष सूचना
“घाबरण्याची गरज नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, मागच्या डेल्टा प्रकाराप्रमाणे या नवीन ओमायक्रॉन प्रकारामुळे ऑक्सिजन पातळीत इतकी घट होत नाही. म्हणून, ज्यांना सहव्याधी नाही त्यांना गृहविलगीकरणात ठेवायला हवं. अशावेळी घाबरून जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणं योग्य नाही. ही जागा सहव्याधी असलेल्या आणि गंभीर आजार होण्याची शक्यता असलेल्यांसाठी ठेवावी. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर त्यातून बरे होण्याचा वेगही जास्त आहे.
गुलेरिया यांनी असेही म्हटले आहे की भूतकाळातील संसर्गापासून मिळालेल्या उच्च पातळीच्या प्रतिकारशक्तीमुळे आणि दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे कव्हरेज ६० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला देश अधिक चांगल्या स्थितीत आहे.
“साथ अद्याप संपलेली नाही. नव्याने बाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ पाहत आहोत. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. ओमायक्रॉन या नव्या करोनाप्रकाराचा प्रादुर्भावही पाहायला मिळत आहे, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षाच्या सुरूवातीस स्थिती खूप चांगली आहे. हे अनेक घटकांमुळे आहे,” असेही गुलेरिया म्हणाले.
“पहिली गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारशक्तीची पातळी खूप चांगली आहे.
लसीकरण मोहिमेमुळे, जवळजवळ ६० टक्के प्रौढ लोकसंख्येला दुहेरी लसीकरण केले जाते. नैसर्गिक संसर्गामुळे मोठ्या संख्येने लोकांना प्रतिकारशक्ती देखील मिळाली आहे आणि सेरोसर्वे डेटा असे सूचित करतो की लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे,” तो म्हणाला.“दुसरी गोष्ट, आपण सुविधांच्या बाबतीतही चांगले तयार आहोत. मग ते मेडिकल ऑक्सिजन प्लांट्स असोत, आयसीयू बेड्स असोत, व्हेंटिलेटर असोत. त्यामुळे तयारी आणि प्रतिकारशक्तीच्या बाबतीत आपण चांगल्या स्थितीत आहोत,” असं गुलेरिया म्हणाले.
आणखी वाचा – Corona Update : देशात करोनाचा कहर; गेल्या २४ तासांत २२,७७५ नव्या करोना बाधितांची नोंद
गुलेरिया यांच्या मते, कोविड-योग्य वर्तन हे नवीन प्रकाराशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी साधन असेल. “म्हणून, तुम्ही बाहेर जाताना मास्क नीट परिधान करणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात धुणे हे महत्त्वाचे आहे,” असं गुलेरिया म्हणाले. ओमायक्रॉनवरील प्राथमिक डेटाचा संदर्भ देत, देशात आणि बाहेर, गुलेरिया म्हणाले की प्रसार थांबवण्यासाठी चाचणी महत्वाची आहे.
“भूतकाळाच्या तुलनेत घाबरण्याचे कारण नाही. कारण आम्ही युरोप, यूएस आणि दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडणाऱ्या Omicron विषाणूचं स्वरुप पाहिलं असता ते सौम्य आहे. त्यामुळे फ्लूसारखी लक्षणे दिसतात आणि हॉस्पिटल आणि ऑक्सिजनची गरज फारच कमी असते. रुग्णांची संख्या वाढेल, परंतु रुग्णालयात दाखल होण्याइतके गंभीर परिणाम होणार नाहीत, असंही गुलेरिया म्हणाले.
गुलेरिया यांनी भर दिला की, ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांनाही लस गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण देत राहतील.“आमच्याकडे डेटा आहे जो स्पष्टपणे दर्शवितो की लसीकरण गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करत आहे. त्यामुळे ज्यांचं लसीकरण झालेले नाही, त्यांनी पुढे येऊन लस घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे त्यांनीही तो वेळेत घ्यायला हवा. कारण तुम्ही दोन्ही डोस घेतल्यावरच तुमचे पूर्णपणे संरक्षण होईल,” असंही गुलेरिया यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment