कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Thursday, December 30, 2021

तिसऱ्या लाटेचे आव्हान

गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबई आणि राज्यात पुन्हा एकदा रुग्णवाढ होऊ लागली आहे. याचबरोबरीने देशात ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराने बाधित रुग्णांचा आकडादेखील वाढू लागला आहे. गेले काही महिने खाली जात असलेला रुग्णालेख पुन्हा एकदा वर जाऊ लागल्याचे प्रमुख कारण ओमायक्रॉन असू शकते. २६ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला ज्ञात रुग्ण नोंदवला गेल्यानंतर त्याच्या अतिसंसर्गजन्यतेबाबत […] गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबई आणि राज्यात पुन्हा एकदा रुग्णवाढ होऊ लागली आहे. याचबरोबरीने देशात ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराने बाधित रुग्णांचा आकडादेखील वाढू लागला आहे. गेले काही महिने खाली जात असलेला रुग्णालेख पुन्हा एकदा वर जाऊ लागल्याचे प्रमुख कारण ओमायक्रॉन असू शकते. २६ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला ज्ञात रुग्ण नोंदवला गेल्यानंतर त्याच्या अतिसंसर्गजन्यतेबाबत अभ्यास सुरू आहे. ओमायक्रॉन हा उत्परिवर्तनातून उद्भवलेला नवप्रकार असून, त्याची वाटचाल विज्ञाननियमानुसार होतच राहणार. आता प्रश्न आपली सरकारे आणि जनता याविषयी काय करणार असा आहे. भारताच्या दृष्टीने ओमायक्रॉन ही तिसरी लाट ठरेल. इतर बऱ्याच ठिकाणी एव्हाना चौथी लाट सुरू झाली आहे. भारत आणि महाराष्ट्रापुरता विचार केल्यास, दोन आघाडय़ांवर आपण ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम झालो आहोत. देशातील अर्ध्याहून जनता आता पूर्णत: लसीकृत झालेली आहे. ८२ टक्क्यांहून अधिकांनी किमान एक लस घेतलेली आहे. ही झाली एक जमेची बाजू. दुसरी अनुभवातून मिळालेल्या शिकवणुकीची. करोनाच्या सर्व उपप्रकारांमध्ये डेल्टा हा नि:संशय सर्वात भीषण उपप्रकार होता आणि तो भारतात उद्भवला. आज जनुकीय क्रमनिर्धारणाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे ओमायक्रॉन चटकन हुडकला गेला. तसे डेल्टाच्या वेळी नव्हते. गेल्या वर्षी याच काळात डेल्टा प्रथम उद्भवला, पण त्याची ओळख पटवण्यासाठी दोन महिने लागले. या काळात त्याने भारतात लाखो जीवांमध्ये शिरकाव केलेला होता. तेव्हा लशीचे कवच जवळपास कोणाकडेही नव्हते. आता परिस्थिती वेगळी आहे. डेल्टाने मोठय़ा प्रमाणात संहार घडवला आणि आर्थिक नुकसान तर मोजदादीपलीकडचे घडवले. त्या वेळच्या काही चुकांची पुनरावृत्ती आता होऊ नये यासाठी आपण सजग आहोत? दिल्ली सरकारने सरसकट पुन्हा शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद केली आहेत. जवळपास प्रत्येक सरकारला रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे खूळ जडले आहे. हे उपाय माणसांना थांबवण्यासाठी आहेत, की विषाणूला हे प्रथम ठरवले पाहिजे. कारण विषाणू प्रतिबंधासाठी रात्रीची संचारबंदी हा उपाय हास्यास्पद ठरतो. मुखपट्टी हा करोनाविरोधात लशीपेक्षाही प्रभावी उपाय ठरतो हे वारंवार सांगितले जाते. परंतु त्याविषयी जुजबी सूचनांपलीकडे आग्रह धरला जात नाही. गेल्या वर्षी डेल्टाचा उद्रेक सुरू झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये निवडणुका हट्टाने घेतल्या गेल्या. यंदा उत्तर प्रदेश या मोठय़ा राज्यासह पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्या पुढे ढकलणार का, याविषयी निवडणूक आयोगाने अद्याप काहीच म्हटलेले नाही. शिवाय खासगी आस्थापना बंद करून रोजगार घुसमटवणारी सरकारे राजकीय प्रचारसभांच्या बाबतीत मात्र कोणतीही बंधने पाळण्यास तयार नसतात ही तक्रार करोना सुरू झाल्यापासून सातत्याने केली जाते आणि ती रास्तच आहे. ओमायक्रॉनची अतिसंसर्गजन्यता पाहता, तो सध्याच्या बहुतेक लसकवचांना दाद देत नाही. तेव्हा त्याला थोपवण्याचा अतिरेकी प्रयत्न करू नये या निष्कर्षांप्रत जगभरातील विश्लेषक आलेले आहेत. याशिवाय अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक देशात परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे कोणत्याही एका देशाचे प्रारूप आदर्श म्हणून दुसऱ्या देशाला जसेच्या तसे अंगीकारता येणार नाही. या मोहिमेत कोणीही कायमस्वरूपी पराभूत वा विजेता ठरत नाही. इतर बहुतेक आघाडीच्या देशांच्या तुलनेत आपल्या देशात लस अनास्था अत्यल्प आहे, हे आपले बलस्थान ठरू शकते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या चुका अधिकाधिक प्रमाणात टाळणे इतके तरी आपण करू शकतोच.

No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...